Skip to main content

Ego

अहंकार (Ego) या बद्दल अनेक वेळा गल्लत होते.सामान्यतः गर्व (Pride),मी पणा, स्वतःचा मोठेपणा मिरवणे याला आपण अहंकार म्हणतो.एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण सहज बोलून जातो त्याच्या मध्ये खूप ego आहे.मुळात अहंकार ही खूप काटेकोर (precise term) संकल्पना आहे.अहंकार म्हणजे एक वृत्ती.अहंकार स्वतः उथळ असल्यामुळे , स्वतःच अस ठोस अस काही नसल्याने इतर गोष्टींच्या मार्फत स्वतःच  अस्तित्व प्रदर्शित करत असते .निसर्गातील अहंकार वृत्ती  जन्मसोबतच माणसाला जोडली जाते.आता नैसर्गिक अहं वृत्ती ही व्यक्तिगत अहंकार बनते.व्यक्तिगत अहंकाराची सर्वात पहिली ओळख ही शरीर आणि मना सोबत असते आणि शरीरा मार्फत तो आता इतर अनेक गोष्टीला चिटकतो.उदा.नाव, गाव , देश, धर्म, कुटुंब,शिक्षण, गाडी, बंगला,मित्र,पद, प्रतिष्ठा.

माणसाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी अहंकार (मी) असतो.मी पाहिलं, मी ऐकलं, मी हे केलं, मी उद्या ते करणार आहे , माझं अस, माझं तस.

काही वेळेला मानस अहं ला Problem समजतात आणि अहंकार सोडण्याचा अट्टहास करतात, जे अशक्य आहे.जो पर्यंत माणूस जिवंत आहे तो पर्यंत अहंकार राहणारच.कारण शरीर ही अहं ची Primary Identity आहे .

अहं ला Drop करण्याचा प्रयत्न करण्या पेक्षा अहं ला त्याची योग्य Position ला ठेवण महत्वाचं आहे . आपण स्वतः चाच मूर्खपणा तठस्त पणे पाहायला शिकलं पाहिजे तरच हे शक्य आहे.कारण Ego  स्वतःला बदलण्या मध्ये कुठलाही Interest  दाखवत नाही.Ego is not real self but borrowed self identity.पण ही गोष्ट इगो ला मान्य नाही. स्वतःचे Beliefs  मान्यता माणसाला एवढ्या प्रिय असतात की कुणी आपली चूक दाखवली तर माणसाला कधीच आवडत नाही कारण  Ego आडवा येतो.माणसाला कुणी आपल्या पेक्षा वरचढ असलेलं कधीच आवडत नाही कारण Ego Hurt होतो,आपण आपले मित्र म्हणून त्याच लोकांना निवडतो जिथे Ego ला Comfortable वाटते,माणसाला सतत इतरांवर Dominant राहायला आवडत.काही लोक तर अनोळखी ठिकाणी जायचं म्हणलं तर सोबत 1-2 ओळखीच्या लोकांना स्वखर्चाने घेऊन जातात जेणे करून मानसन्मान द्यायला कुणीतरी पाहिजे.Social Media वर photo जरी upload करायचा असला तरी आपण आधी चांगला फोटो शोधतो त्याला फिल्टर करतोत नंतर upload करतो.हातापायाला कुठे काही लागलं,खरचटलं तर आपण लक्ष नाही देत पण तेच जर चेहऱ्याला काही लागल तर 10 वेळा आरशात पाहतोत .Ego has thousand faces.

अहंकार माणसाला प्रेम करू देत नाही कारण कारण प्रेमात अहंकार स्वतःला विसरत असतो.अहंकाराला दुःख आवडते कारण दुःखात त्याला सतत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत असते.त्यामुळे आपल्याला काही वर्षे पूर्वी झालेलं अपमान आठवणीत असतो.भांडण झाली तर लोक वर्षानुवर्ष बोलत नाहीत, सात पिढ्या दुष्मनी चालते.

अहं ला ओळखून त्याला योग्य दिशा देणं हे खूप महत्त्वाचं काम आहे.

Personality is nothing but the manifestation of Ego. Ego is the actor behind the personality who is sitting at the centre of mind and operate from there.

Comments

Popular posts from this blog

"अर्थाच्या शोधात" Man Search For Meaning.

अर्थाच्या शोधात हे "Man search for meaning" या इंग्लिश पुस्तकाचा मराठीत अनुवाद आहे .ही गोष्ट आहे डॉ.व्हिक्टर फ्रँकल नावाच्या ऑस्ट्रियन सायकॉलॉजिस्ट ची ,जेव्हा हिटलरने जगा मध्ये विध्वंस घडवायला सुरवात केली होती ज्यू लोकांची सामूहिक हत्या कत्तली करण्यात येत होत्या तेव्हा डॉ. व्हिक्टर फ्रँकल हे ऑस्ट्रिया येथे आपल्या कुटुंबा सोबत राहत होते येत्या काही दिवसात हिटलर च्या माणसांच्या हाती लागू ही गोष्ट त्यांना माहीत होती आणि त्यांना अमेरिकेला जाण्याची संधी सुद्धा होती. पण एक दिवस घरी टेबलावर ठेवलेल्या तुटलेल्या भिंतीचा मार्बलच एक तुकडाकडे त्यांचे लक्ष गेले व त्यावर हिब्रू भाषे मध्ये काहीतरी लिहले होते वडिलांना त्यांनि अर्थ विचारला असता वडिलांनी सांगितले की "आई आणि वडिलांचा मान राख म्हणजे तुमचा दिवस चांगला जाईल" त्याच वेळी आई वडिलांना एकटे सोडून न जान्याचे त्यांनि ठरवले. आई वडिलांसोबत च राहण्याचा निर्णय घेतला शेवटी होयचा ते झालेच हिटलर च्या सैनिकांनी येऊन त्यांना जर्मनी ला छळछावणीत घेऊन गेले व तेथे त्यांच्या सहित सर्व ज्यू लोकांवर अन्वयीत अत्याचार सुरू झाल...