अर्थाच्या शोधात हे "Man search for meaning" या इंग्लिश पुस्तकाचा मराठीत अनुवाद आहे .ही गोष्ट आहे डॉ.व्हिक्टर फ्रँकल नावाच्या ऑस्ट्रियन सायकॉलॉजिस्ट ची ,जेव्हा हिटलरने जगा मध्ये विध्वंस घडवायला सुरवात केली होती ज्यू लोकांची सामूहिक हत्या कत्तली करण्यात येत होत्या तेव्हा डॉ. व्हिक्टर फ्रँकल हे ऑस्ट्रिया येथे आपल्या कुटुंबा सोबत राहत होते येत्या काही दिवसात हिटलर च्या माणसांच्या हाती लागू ही गोष्ट त्यांना माहीत होती आणि त्यांना अमेरिकेला जाण्याची संधी सुद्धा होती. पण एक दिवस घरी टेबलावर ठेवलेल्या तुटलेल्या भिंतीचा मार्बलच एक तुकडाकडे त्यांचे लक्ष गेले व त्यावर हिब्रू भाषे मध्ये काहीतरी लिहले होते वडिलांना त्यांनि अर्थ विचारला असता वडिलांनी सांगितले की "आई आणि वडिलांचा मान राख म्हणजे तुमचा दिवस चांगला जाईल" त्याच वेळी आई वडिलांना एकटे सोडून न जान्याचे त्यांनि ठरवले. आई वडिलांसोबत च राहण्याचा निर्णय घेतला शेवटी होयचा ते झालेच हिटलर च्या सैनिकांनी येऊन त्यांना जर्मनी ला छळछावणीत घेऊन गेले व तेथे त्यांच्या सहित सर्व ज्यू लोकांवर अन्वयीत अत्याचार सुरू झाले ,जनावर प्रमाने वागणूक करण्यात येत होती दिवस भर काम व बदल्यात फक्त पावाचा एक तुकडा देण्यात येत होता आणि जो कुणी काम करण्या योग्य वाटत नसेल त्याला लगेच मारून टाकण्यात येत असे. त्या छळछावणीत अनेक जण रोज मरत होती काहींना मारणायत येत होतं तर काही जण तेथील छळाला कंटाळून आत्महत्या करत होते. या अतिशय बिकट परस्तीती मध्ये सुद्धा व्हिक्टर फ्रँकल याना एक गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे भोवतालची परिस्थिती किती जरी वाईट प्रतिकूल असली तरी तुमचे विचार करण्याचे स्वातंत्र्य ती हिरावून घेऊ शकत नाही तुमचे विचार कसा करावा याचे स्वातंत्र्य अबाधित राहते . जगण्याची प्रचंड इच्छा शक्ती ,आणि देवाची कृपा यामुळे जवळपास 3 वर्ष नंतर रशियन सैनिकांच्या आक्रमण मुळे व्हिक्टर फ्रँकल व अनेकांची सुटका झाली .परंतु बाहेर आल्या नंतर त्यांना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली लोकांना आनंद होणे ऐवजी ते नैराश्यात डूबले होते ,ज्यांच्या साठी जगायचे होतेच लोक राहिले नाहीत , अनेकांचे जवळचे लोक जगात नव्हते , अनेकांचे संसार उध्वस्त झालेले होते ,कित्तेक जण आत्महत्या चा मार्ग अवलंबत होते . तेव्हा डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल यांनी आपले समुपदेशन केंद्र सुरू केले . लोगो थेरपी नावाच्या सायकोथेरपीचा त्यांनी शोध लावला."लोगो" हा ग्रीक भाषेतला शब्द आहे. लोगो म्हणजे "अर्थ ". प्रत्येकाच्या जीवनाला काहीना काही अर्थ असतो तो अर्थ प्रत्तेकाने शोधला पाहीजे, ज्याला कशासाठी जगायचे आहे हे कळले तो कुठल्याही पपरिस्थितीशी लढून जगू शकतो या तत्व वर त्यांची थेरपी होती. अतिशय कठीन मानसिक प्रसंगातून त्यांनी लोकांना वाचवले .ह्या पुस्तकात दोन भाग केलेले आहेत पहिल्या भाग मध्ये त्यांचे छळ छावणीतले अनुभव आहेत तर दुसऱ्या भागा मध्ये लोगो थेरपी बद्दल विसृत माहिती दिलेली आहे.सुरवातीला डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांनी हे पुस्तक निनावी प्रकाशित करण्याचे ठरवले होते पण त्यांच्या मित्रांच्या आग्रहा मुळे त्यांनी स्वतःच्या नावाने प्रकाशित केले.जगभरातील अनेकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरलेल आहे.
Comments
Post a Comment