अहंकार (Ego) या बद्दल अनेक वेळा गल्लत होते . सामान्यतः गर्व (Pride), मी पणा , स्वतःचा मोठेपणा मिरवणे याला आपण अहंकार म्हणतो . एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण सहज बोलून जातो त्याच्या मध्ये खूप ego आहे . मुळात अहंकार ही खूप काटेकोर (precise term) संकल्पना आहे . अहंकार म्हणजे एक वृत्ती . अहंकार स्वतः उथळ असल्यामुळे , स्वतःच अस ठोस अस काही नसल्याने इतर गोष्टींच्या मार्फत स्वतःच अस्तित्व प्रदर्शित करत असते . निसर्गातील अहंकार वृत्ती जन्मसोबतच माणसाला जोडली जाते . आता नैसर्गिक अहं वृत्ती ही व्यक्तिगत अहंकार बनते . व्यक्तिगत अहंकाराची सर्वात पहिली ओळख ही शरीर आणि मना सोबत असते आणि शरीरा मार्फत तो आता इतर अनेक गोष्टीला चिटकतो . उदा . नाव , गाव , देश , धर्म , कुटुंब , शिक्षण , गाडी , बंगला , मित्र , पद , प्रतिष्ठा . माणसाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी अहंकार ( मी ) असतो . मी पाहिलं , मी ऐकलं , मी हे केलं , मी उद्या ते करणार आहे , माझं अस , माझं तस ....